इस्रायलमधील भारतीयांनी सुरक्षित भागात स्थलांतरित व्हावे
जेरुसलेम : इस्त्रायलच्या उत्तर सीमावर्ती भागातील सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास इस्रायलच्या उत्तरेकडील गॅलिली प्रदेशात हिजबुल्लाने लेबनॉनमधून केलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात केरळमधील तीन भारतीय कामगार जखमी झाले, (Hezbollah missile attack) पॅटनिबिन मॅक्सवेल असे मृत्यूमुखी पडलेल्या केरळमधील कोल्लम येथील नागरिकाचे नाव आहे. बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन असे अन्य दोन अशी जखमीं झाले आहेत. Hezbollah missile attack
यानंतर एका दिवसाने भारतीय दूतावासाने येथील सीमाभागातील भारतीयांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे,इस्रायलमधील भारतीय नागरिक विशेषतः जे दक्षिण आणि उत्तर सीमावर्ती भागात काम करतात त्यांना सल्ला दिला जातो की, त्यांनी स्वतः इस्रायलमधील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावं. तसेच भारतीय दुतावास भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे, असे निवेदन प्रसारित केले आहे.
हमास इस्रायल युद्ध सुरूच आहे,तसेच लेबनॉनमधील शिया हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ ८ ऑक्टोबरपासून इस्रायलमध्ये दररोज रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत. या युद्धात ३० हजाराहून जास्त पॅलेस्टाईन नागरिक मृत्यू पावले आहेत. इस्रायल मधील शेती व बांधकाम क्षेत्रात तसेच आरोग्य व इतर सेवा उद्योगात भारतीय कामगार काम करत आहेत. सध्या १८ हजार भारतीय कॉन्ट्रॅक्ट कामगार म्हणून इस्रायलमध्ये काम करत आहेत
युद्ध विरामासाठी जोरदार प्रयत्न सुरू
गाझा पट्टीतून इस्त्रायली ओलीसांची सुटका आणि युद्ध संपविण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली आहे.युद्धविराम झाला, तर इस्त्रायली ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात हमासला आपल्या अनेक कैद्यांची इस्त्रायली तुरुंगातून सुटका हवी आहे, पॅरिसमध्ये या आठवड्याच्या शेवटी झालेल्या बैठकीत अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला; परंतु त्यात हमासच्या प्रतिनिधींचा समावेश नव्हता.
पॅरिस बैठकीनंतर इजिप्शियन, कतारी आणि अमेरिकन माध्यमांनुसार, दोहा येथे झालेल्या चर्चेत इस्त्रायल आणि हमासचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यापूर्वी युद्धविराम करणे हे या बैठकीचे ध्येय आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.
ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण