जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार ६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येत होते. परंतु आजच्या रिपोर्टनुसार मात्र यामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून दिलासा देणारी आहे. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार वडगांव आनंद ८, आपटाळे १, पादीरवाडी २, पिंपळगाव सिध्दनाथ २, शिरोली तर्फे कुकडेश्वर १, खामगाव २, कोपरे १, मंगरूळ १, निमगाव सावा १, नारायणगाव २ , येडगाव १, ओझर १, खामंडी १, ओतूर १, डिंगोरे ४, तेजेवाडी १, पिंपळवंडी ६, उंब्रज १, वडगांव कांदळी १, बस्ती १, शिरोली बु. ५, गोळेगाव २, कुमशेत ३, सावरगांव २, गुंजाळवाडी आर्वी १, पारुंडे ३, काटेडे २, वडज २, येणेरे २, जुन्नर नगरपरिषद २ यांचा समावेश आहे.