Friday, December 27, 2024
Homeग्रामीणदेवलदरी येथे आदिवासी महिलेवर रानडुक्कराचा जीवघेणा हल्ला, महिला गंभीर जखमी

देवलदरी येथे आदिवासी महिलेवर रानडुक्कराचा जीवघेणा हल्ला, महिला गंभीर जखमी

सुरगाणा (दौलत चौधरी) : वनपरिक्षेत्र करंजुल( क) अंतर्गत देवलदरी येथील चनीबाई मोतीराम पवार या 53 वर्षीय महिलेवर रानडुक्कराने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून महिलेस सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर महिला.दि. 22 रोजी गावालगतच्या त्यांच्याच खाजगी शेतात बुवाचा दरा येथे सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेळ्या चरण्यासाठी गेली होती. शेळ्या चारुन झाल्यावर पाणी पाजण्याकरीता शेता लगतच्या झ-यावर बक-या घेऊन जात असतांना पाठीमागून जोरात येऊन धडक देत डुकराने जोरदारपणे हल्ला चढविला. 

डोक्यावर फाट्याचा (सरपणाचा) भारा असल्याने व तो दोन्ही हाताने भारा धरला असल्याने बेसावध क्षणी हल्ला केल्याने महिलेस जमीनीवर पाडले. डुकराने डाव्या पायाला पोटरीला, उजव्या हाताला चावा घेत गंभीर जखमी केले. पोटावर तसेच पोटावर तिक्ष्ण सुळे दाढांनी वार करणार तोच महिलेने केलेल्या धावा घेतली, मला वाचवा, मला वाचवा अशी आरडाओरडा केल्याने मदतीला धावल्याने महिलेचे प्राण वाचले. 

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिक ढुमसे यांनी तात्काळ दखल घेत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले असून वनपाल काशिनाथ गायकवाड, वनमजूर योगेश गांगुर्डे, नामदेव ठाकरे, पोलिस पाटील रेखा पवार, लक्ष्मण पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. 

सदर भाग हा वघई डांग गुजरात लगतचा राखीव जंगलव्याप्त भाग असल्याने नेहमीच हिंस्र श्वापंदाचा वावर करंजुल, चापापाडा, भदर, देवलदरी, खुंटविहीर, गोणदगड, उदालदरी, झारणीपाडा, पिंपळसोंड, उंबरपाडा, मालगोंदा या भागात हिंस्र वन्यजीवांचा वावर वाढला आहे. काही वर्षांपुर्वी वाघाच्या हल्ल्यात भदर येथील सरपणा करीता जंगलात गेलेल्या दोन महिलांचा हल्ला करुन फडशा पाडला होता. या सिमावर्ती भागात रानडुक्कराचा सुळसुळाट झाला असून पावसाळ्यात पेरणी पासून तर शेतात पिक हाती लागे पर्यंत अतोनात पिकाचे नुकसान केले जाते. 

मात्र वनविभागाच्या उदासिनतेमुळे तसेच कडक नियमावली मुळे सरकारी दफ्तरी नोंद केली जात नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. रानडुक्कराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय