Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar : शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त...

Sharad Pawar : शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका

Sharad Pawar Z Plus Security : केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि पवार यांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर शरद पवार यांनी मात्र या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, देशातील तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं, तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे पवार म्हणाले, कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar Z Plus Security वर निलेश राणे यांची टीका

दरम्यान, भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर उपरोधिक टीका केली आहे. राणे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?”

Advertisement
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून

MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश

मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय