हडपसर : एस.एम.जोशी महाविद्यालयातील (SM Joshi college) शारिरीक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत योगशाळा कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील पार्वतीबाई दगडू तुपे मुलींच्या वस्तीगृहातील मुलींसाठी 30 दिवसीय मोफत योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Yoga workshop concluded in SM Joshi college
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी योग प्रशिक्षक हेमा ताकवले, डॉ.प्रणिता गेटलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी योगाच्या प्रभावाचे वर्णन केल. तसेच योगाचे मानसिक, शारीरिक आणि आत्मिक लाभ सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुलींच्या वस्तीगृहाच्या चेअरमन डॉ.शिल्पा शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कशारिरीक शिक्षण संचालक प्रा.दत्ता वासावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रज्ञा बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय जडे, डॉ.शहाजी करांडे उपस्थित होते. योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा.दत्ता वासावे, डॉ. शिल्पा शितोळे, प्रा.रेखा कराड, प्रा.प्रज्ञा बनसोडे यांनी सहकार्य केले. योग कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
हे ही वाचा :
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा