Friday, May 3, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : जागतिक वसुंधरा दिन

विशेष लेख : जागतिक वसुंधरा दिन

आज जागतिक वसुंधरा दिन त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे. अशात आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सुरुवात व मूळ संकल्पना : अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना मांडली. त्यांनी अमेरिकेतील लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला आणि राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे 1970 सालापासून हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ अर्थात ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

गुगलचे विशेष डुडल : अ‍ॅनिमेटेड डुडलमधून संदेश देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे.

या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची टॅगलाईन Invest in our plannet अशी आहे.

आपण काय करू शकतो?

▪ नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देऊया.

▪ अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

▪ शक्य असेल तेवढी झाडे लावूया, तसेच लावलेल्या झाडांचे रक्षण करूया.

▪ जमीन व जल प्रदूषण करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळूया.

▪ पृथ्वीचे तापमान वाढणार्‍या घटकांचे उत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.

▪ टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना दैनंदिन जीवनात अंमलात आणूया.

▪ शालेय स्तरापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण करून जबाबदारीची जाणीव करून देऊया.

▪ वने, वन्यप्राणी निसर्गाचा अविभाज्य घटक असून पर्यावरण संतुलनात पर्यायाने पृथ्वीच्या वातावरणीय समतोलामध्ये या घटकांची महत्वाची भूमिका आहे हे जनमानसात ठसवूया.

▪ निसर्गाने दिलेल्या साधन-संपत्ती जपून वापरूया आणि गरजेपुरती वापरूया.

▪ साधन-संपत्तीचा प्रमाणापेक्षा अधिक वापर कमी करूया व भावी पिढीसाठी जतन करूया.

▪ पर्यावरण रक्षण हे आद्य कर्तव्य समजून वसुंधरेला स्वच्छ व सुजलाम् सुफलाम ठेवण्यासाठी रोजच वसुंंधरा दिन करूया.

संकल्प करूया: हरित वसुंधरेचे विश्वस्त या नात्याने संकल्प करूया, वनसंवर्धनाचा, ऊर्जा-पाणी बचतीचा, समृद्ध भविष्याचा नवनिर्मितीचा.

– रत्नदिप सरोदे, कृषि पदवीधर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय