सोलापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खाजगीकरणाविरोधात सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटनर युनियनच्या वतीने काळ्या फिती लावून सिटू निमंत्रक डी. रमेश बाबू यांच्या नेतृत्वाखाली काळा दिवस पाळण्यात आला.
रेल्वे खाजगीकरण करुन रेल्वे मजूर, कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणारे धोरण केंद्र सरकार राबवत असल्याने काळ्या फिती लावून हे आंंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनामध्ये डी. रमेश बाबू नेताजी घोडके, संदीप चंद्रशेखर आदींचा समावेश होता.