Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यकेळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर 

केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर 

महाराष्ट्र आरोग्यनामा : केळी हे सर्व ऋतू मिळणारे फळ असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. आपण केळी खाण्याचे फायदे आणि तोटे समजून घेतले. आता आपण खालील माहिती पाहूयात. 

⏺️ केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? 

● एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत. 

● केळी हे एकदम सकाळी किंवा रात्री खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते . सर्दी, खोकला झालेला असताना किंवा दम्याचा त्रास असल्यास केळी खाऊ नयेत. 

● केळी खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये, यासाठी मुलांना केळी हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.

● सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.

● मधुमेह असल्यास केळी खाणे टाळावे.

● लठ्ठपणा असल्यास किंवा वजन वाढलेले असल्यास केळी खाऊ नयेत. एका केळ्यामध्ये जवळपास १०० ते १२० कॅलरीज असतात त्यामुळे आणखी वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

● कृत्रिमरीत्या पिकविलेली केळी खाऊ नयेत यासाठी बाजारातून केळी आणताना ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत की नाही ते पाहावे.

● जास्त पिकलेली केळी खाऊ नयेत.

● मधुमेह असल्यास केळी खाणे टाळावे. केळ्यात १४ ग्रॅम साखर असून कर्बोदकेही भरपूर प्रमाणात असतात. केळी खाण्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय