पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय उद्योगपतींच्या यादीत रतन टाटा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज देशाच्याच नाही तर जागतिक पातळीवरही टाटा समुह मोलाची भूमिका निभावत आहे. टाटा मीठा पासून ते आयटी पर्यंत प्रत्येक क्षेत्रात या समुहाने आपली ओळख निर्माण केली आहे. टाटा समुहात आज अंदाजे १०० हून अधिक कंपन्या आहेत. त्या उभ्या करण्यामागे रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे. रतन टाटा यांनी जेआरडी टाटा यांच्यानंतर १९९१ मध्ये टाटा समुहाची धुरा सांभाळली. आज देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात टाटा समुहाच्या शाखा विस्तारलेल्या आहेत. टाटा समुहात प्रामुख्याने ३० मोठ्या कंपन्यांचा समावेश असून १०० पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीचा विस्तार आहे. टाटा समुहातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज, टाटा पावर, टाटा ग्लोबल बेवरेजेज, टाटा केमिकल्स, इंडियन होटल्स और टाटा टेलीसर्विसेज यांचा समावेश आहे.
रतन यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा मोटर्सची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंद झाली.टाटा मोटर्स ही जगातील सर्वात मोठी ट्रक,बसेस व कार उत्पादन करणारी कंपनी आहे. १९९८ मध्ये टाटा मोटर्सने पहिली टाटा इंडिका कार भारतीय बाजारपेठेत आणली. २००० मध्ये रतन टाटा यांना पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारकडून देण्यात येणारा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. टाटा उद्योगसमूहामध्ये ७,०२,४५४ कामगार कर्मचारी कार्यरत आहेत,अशी माहिती उपलब्ध आहे.



हे ही वाचा :
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व
विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !
विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्या दुर्घघटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !