Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

गोपीचंद पडळकर यांना निषेध करणं भोवले; उपसभापतींनी सुनावली शिक्षा

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेत गैरवर्तणूक करणं चांगलंच भोवलं. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज (दि.२७) पूर्ण दिवस सभागृहात पडळकरांना बोलू न देण्याची शिक्षा दिली.

---Advertisement---

सविस्तर वृत्त असे की, विधानपरिषदेमध्ये मध्यंतरानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होत्या. या दरम्यान बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वेळेचे बंधन घालून त्यांना बोलण्यास रोखले. त्यावेळी पडळकर यांनी उपसभापतींवर गंभीर आरोप केले. पडळकर यांनी आपल्या हातातील कागदपत्रे फाडून नीलम गोऱ्हे यांचा निषेध केला. तुम्ही सभागृहाचे नियोजन नीट ठेवत जा, आम्ही बोलायला लागलो की तुम्ही लगेच बेल वाजवतात. नेहमी सभागृहात तुम्ही मला जाणीवपूर्वक बोलू देत नाहीत, असा गंभीर आरोप पडळकरांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर केला.

पडळकरांच्या या कृतीवर नीलम गोऱ्हे खूपच संतापल्या. पडळकर यांचे सभागृहातील वर्तन संसदीय परंपरेला अनुसरून नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तरी सुद्धा पडळकर शांत होत नव्हते. अखेर गोऱ्हे यांनी मार्शलला बोलावून सभागृहाबाहेर काढण्याचा दम पडळकरांना दिला. याप्रसंगी नीलम गोऱ्हे यांनी पडळकरांना चांगलच झापत गुरुवारी त्यांना पूर्ण दिवस सभागृहात बोलू दिले जाणार नाही, ही शिक्षाही सुनावली.

---Advertisement---

पडळकरांनी मागीतली माफी

पडळकर-गोऱ्हे यांच्यात रंगलेल्या वादात आमदार सचिन अहिर, आमदार नरेंद्र दराडे यांनी मध्यस्थी करत पडळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पडळकरांनी माघार घेतली. माझी चूक नसतानाही मी माझे शब्द माघारी घेतो. व पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही, असे सांगत या वादावर पडदा टाकला. परंतु उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles