Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भीषण अपघात : भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

Washim Accident : वाशिम ते रिसोड मार्गावर भरधाव असलेल्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडीचा चालक संतोष पैठणकर यांचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने वनोजा गावाजवळील पुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत चालक संतोष पैठणकर यांचा मृत्यू झाला, तर इतर ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

---Advertisement---

अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीतील एक महिला गाडीची समोरची काच फोडून बाहेर फेकली गेली. जखमींमध्ये रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील पांडुरंग गवळी, आसाराम केंद्रे, संजय गवई आणि त्यांच्या पत्नी अशा सहा जणांचा समावेश आहे. हे प्रवाशी त्यांची मुले वाशिमच्या नवोदय विद्यालयात सोडून घरी परतत असताना हा अपघात घडला.

अपघातात जखमींना तात्काळ वाशिमच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---Advertisement---

Washim Accident

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles