Tuesday, September 17, 2024
Homeजिल्हाWardha : वर्धा जिल्हास्तरीय शेतमजूर महिला परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

Wardha : वर्धा जिल्हास्तरीय शेतमजूर महिला परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

वर्धा : वर्धा जिल्हास्तरीय शेतमजूर महिला परिषद सेलू येथे संपन्न झाली. या परिषदेत सेलू, वर्धा व आष्टी अशा तीन तालुक्यातून एकूण 70 महिला उपस्थित होत्या. या परिषदेची सुरुवात क्रांतिकारी गीतांनी झाली. परिषदेत सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व शोकप्रस्ताव सादर करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक कॉम्रेड आशा इखार यांनी केले आणि उदघाटन कॉम्रेड लता पापणकर यांनी केले. त्यानंतर अध्यक्ष मंडळाची निवड करण्यात आली. (Wardha)

अध्यक्ष मंडळामध्ये सविता मांडरे, संध्या संभे तसेच सुजाता कांबळे हे होते. त्यानंतर शेतमजूर महिलांच्या संदर्भाने अहवाल विद्या निकाळजे यांनी सादर केला. अहवालावर एकूण 7 प्रतिनिधींनी समोर येऊन चर्चा केली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई, रेशन, घर, जमीन, महिलांचे वेतन वाढ तसेच शेतमजूर महिलांची सुरक्षा इत्यादी मुद्दे होते.

यानंतर शेतमजूर युनियनच्या राज्य समिती सदस्य तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड संध्या संभे यांनी अहवालावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. व या सर्व मुद्द्यांवर संघटना संघर्ष करीत आहे. वर्धा जिल्ह्यात या सर्व मुद्द्यांवर संघर्ष करत आपण सर्वजण मिळून शेतमजूर युनियन मजबूत करूया असा विश्वास व्यक्त केला. 9 जणींची शेतमजूर महिला उपसमिती बनवण्यात आली. (Wardha)

आशा ईखार, सुजाता कांबळे, सविता दुर्वे, संध्या संभे, सविता मांडरे, सविता निमजे, वंदना पार्से, निर्मला वाघ व विद्या निकाळजे या समितीच्या सदस्य आहेत.नंतर या नवीन कमिटीची पहिली बैठक घेऊन त्यामधे अशा ईखार यांची निमंत्रक म्हणून तर सुजाता कांबळे व सविता दुर्वे यांची सहनिमंत्रक म्हणून निवड करण्यात आली. ही परिषद राज्य सहसचिव मंजुश्री कबाडे तसेच राज्य समिती सदस्य संध्या संभे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. क्रांतिकारी घोषणा देत व उत्साही वातावरणात परिषद संपन्न झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय