मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पंढरपूरच्या (Pandharpur) आषाढी वारीत “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी – वर्ष २ रे” या उपक्रमांतर्गत 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडून एक नवा इतिहास रचला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
या महाआरोग्य शिबिरात 15,12,774 वारकऱ्यांना आरोग्य तपासणी व उपचार सेवा देण्यात आली, ज्यासाठी 7,500 डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे राबवला गेला. देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरातील महाआरोग्य शिबिरांमध्ये 14 ते 18 जुलै 2024 या कालावधीत विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
आरोग्य शिबिरांतर्गत, प्रत्येक 5 किमी अंतरावर दवाखाने उभारण्यात आले होते. गर्दीमुळे मोठ्या अॅम्बुलन्सच्या अनुपलब्धतेमुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स, 102 आणि 108 सेवा देखील तैनात करण्यात आल्या. महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट्स यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. (Pandharpur)
“आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आरोग्य दिंडी, चित्ररथ, आरोग्य दूत, संदेश टोपी, प्रदर्शनी, आणि ऑडिओ-व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आले.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !