Thursday, October 10, 2024
Homeजिल्हाBirsa Fighters : ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची बैठक आयोजित करा – बिरसा फायटर्सची...

Birsa Fighters : ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची बैठक आयोजित करा – बिरसा फायटर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहादा : अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती आंदोलनावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी तातडीची ट्रायबल ऍडव्हायझर कमिटीची बैठक आयोजित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स (Birsa Fighters) नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसह सर्वसामान्य आदिवासी जनता नासिक जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२४ पासून आंदोलन करीत आहेत. आंदोलनाची तीव्रता गाव पातळीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचलेली आहे. (Birsa Fighters)

त्याचबरोबर आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते आ.कॉ.जे.पी.गावीत, चिंतामण गावीत सह त्यांचे ज्येष्ठ सहकारी २१ ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. ही बाब आदिवासी जनतेच्यावतीने चिंतेची गंभीर बाब आहे.

अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील १७ मध्ये महामहीम राज्यपाल महोदयांनी ९ जून २०१४ रोजी संविधान सुचीनुसार विशेष अधिकारात अनुसूचित क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी बहाल केलेली आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करण्यासाठी कृपया अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात सुरु असलेली चळवळ व पेसा भरतीच्या आंदोलनावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीची ट्रायबल ऍडव्हायझरी कॉन्सिलची बैठक आयोजित करुन महाराष्ट्रातील राखीव मतदार संघातील आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत चर्चाअंती निर्णय होण्यासाठी बैठक आयेाजित करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय