Friday, June 14, 2024
Homeविशेष लेखविशेष : मैत्री

विशेष : मैत्री

मैत्री म्हणजे काय अजून पण कोणाला कळले नाही, आजकाल मैत्री फक्त स्वार्थासाठी लोक करतात. खरी मैत्री होती कृष्ण आणि सुदामाची, लहानपणापासुनचे मित्र होते। एका मित्राला काही झाल की अश्रु दुसऱ्या मित्राच्या डोळ्यातून वाहत होते, अशी ती प्रेमदायक मैत्री कृष्ण आणि सुदामाची होती.

सुदामा आणि श्री कृष्णाने

मैत्रिची व्याख्या सांगितली

त्यांच्या सारखी मैत्री येथे

कधी कोणीच नाही केली..!

मैत्रीत विश्वास असावा लागतो विश्वासातून मैत्री आपली टिकू शकते. आज या कलियुगात काम होईपर्यत मैत्री केली जाते, काम होताच मित्राला पण विसरून जातात. लहानपणीची मैत्री एवढी प्रेमळ आणि सुंदर होती की मित्रांशिवाय अजिबात करमतच नव्हतं, आता मात्र तसं काही राहिलं नाही, आजकालचे लोक मैत्री फक्त मोबाईलशी करतात. ना मित्राची आठवण काढत, ना आलेला एखादा मित्राचा फोन उचलत, व्यस्त राहतात मोबाईल मध्ये अशी आज कालची (डीजीटल)मैत्री झाली आहे. माणसाला माणसाशी बोलायला सुद्धा आता वेळ अपुरा पडतो, ते फक्त व्यस्त मोबाईल मध्ये झाले आहे. आईवडीलांना तर,कधी वेळ दिलाच नाही, मोबाईल आणि मी बाकी काहीच नको, अशी व्यथा आज कलियुगात दिसून येत आहे. जर असचं हे चक्र चालू राहिले तर, मैत्रिला काहीच किंमत राहणार नाही.

वेळ द्या थोडा मित्राला

टिकवा आपल्या मैत्रीला

मित्राशिवाय कोणी धावून

येणार नाही कधी मदतीला..!

खरं तरं कोणत्याही व्यक्तीकडून कशाचीही अपेक्षा ठेवायलाच नको, कारण जे दुसऱ्याकडून होईल. ते आपल्याकडून होईलच असं काही नाही, आपण त्या व्यक्तीपेक्षा काही वेगळं करू शकतो किंवा आणखी काही नवीन बदल आपल्यात घडवून आणता येते. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे, सर्वकाही आपल्याकडून हळू हळू का होईना नक्की होणार. स्वार्थासाठी जर आपली मैत्री असेल तर, त्याच्या पेक्षा मैत्री न केलेली कधीही बरी, कारण मैत्रीत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. मित्र संकटात आहे हे कानी पडताच दुसरा मित्र तत्पर असला पाहिजे, गरज आहे त्या गोष्टीची मदत वेळेवर मित्राला केली पाहिजे. अशी मैत्री हवी, लहानपणापासून एका वर्गात शिक्षण घेऊन, लग्न वगैरे झालं, म्हातारपण आलं, तरी ज्याची मैत्री तुटली नाही. तीच खरी मैत्री म्हणायला हरकत नाही, कारण लोक गरीब मित्र असला की लगेच त्या मित्रापासून दूर जातो. का तर तो गरीब आहे म्हणून त्याला हे नाही कळत की खरचं आपण दोघे लहानपणापासून मित्र आहोत. आपल्या कडे सर्वकाही व्यवस्थित होतं म्हणून आपण यशाची पायरी चढलो, माझ्या मित्राच्या वाट्याला अपयश आले. त्यात याची काय चूक, शेवटी परिस्थिती सुद्धा खूप काही शिकवते, पण जो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो. तो यशाचा पाठलाग करतो,जो यशाचा पाठलाग करतो, तो अपयशी कधीच ठरत नाही.

ज्याच्या मनात जिद्द चिकाटी

पाठलाग करेल तोच यशाचा

गरीबीत सुद्धा उभा मित्रासाठी

त्याला नक्की द्या हात मदतीचा..!

यश त्याच्याच भोवती लोळणं घेते, जो प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि मेहनतीने करते. जो खरी मैत्री निभावते म्हणून मित्रत्वाला जपा कृष्ण सुदामा सारखी आपली मैत्री टिकवण्याचे प्रयत्न करा तरी मैत्री टीकवा. त्यांची मैत्री शेवट पर्यत टिकली, कारण प्रेम, मोह, माया, फक्त त्यांनी मैत्रीत घालवली. म्हणूनच त्याची मैत्री सदैव फुलते राहिली, अहंकार न करता माणुसकी जपा, गर्व करून काही मिळत नाही. मेल्यावर सोबत काहीच नेता येत नाही आहे त्यात समाधानी राहा. बालपणीची मैत्री कायम फुलत राहो माणुसकी नेहमी आपल्या अंगी राहो, माणूस म्हणून जगण्यात सुख आहे, म्हणून आपुलकीने राहा, आनंदी राहा.

मैत्री असावी आपली अशी

सुख दुःखात साथ देणारी

दु:खात मदतीस धावणारी

सुखात आनंद व्यक्त करणारी..!

– दिपाली मारोटकर, अमरावती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय