घोडेगाव : आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी काळे महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी विभागातील माजी विद्यार्थी विशाल गौतम साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच एम.फिल.ची पदवी जाहीर केली आहे.
त्यांना प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील गोहे खुर्द येथील लेखक सीताराम जोशी यांनी लिहिलेल्या ‘अधिकारी माणूस : या आत्मकथनाचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्रबंधिका सादर केली होती.
या संशोधनातूनविशाल साळवे यांनी ‘अधिकारी माणूस’चे कर्ते ‘सीताराम जोशी व्यक्ती आणि कार्य’ या पहिल्या प्रकरणातून लेखकाचा जन्म आणि बालपण, त्यांचे शिक्षण, शिक्षणाची झालेली परवड, त्यांच्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, त्यांचे कार्य तसेच ‘आदिवासी साहित्याची संकल्पना व स्वरूप’ या दुसऱ्या प्रकरणांमध्ये आदिवासी साहित्याची प्रेरणा, आदिवासी साहित्याची संकल्पना, आत्मकथन, आत्मचरित्र व चरित्र या संकल्पना, तर ‘अधिकारी माणूस या आत्मकथनातील घटना, प्रसंगाचे चित्रण’ या तिसऱ्या प्रकरणातून ग्रामीण भागातील बालपण, वसतिगृहातील शिक्षण, पुणे विद्यापीठातील शिक्षण, वैवाहिक जीवन, आदिवासी समाज कृती समितीची स्थापना व कार्य, पुणे विद्यापीठातील कर्तव्याचा काळ इ. तर ‘अधिकारी माणूस या आत्मकथनाचे वाड़मयीन पैलू’ या चौथ्या प्रकरणातून अधिकारी माणूस या आत्मकथनाच्या शीर्षकाचा अन्वयार्थ, प्रसंगवर्णन, निवेदन इ.विविध मुद्द्यांचा परामर्श अभ्यासकाने घेतलेला आहे. हे अभ्यास, संशोधन आज आश्रमशाळा, विविध वसतिगृहात शिक्षण घेणारे विद्यार्थी याना नक्कीच प्रेरणादायी आणि बळ देणारे ठरेल हेच या संशोधनाचे महत्व आहे.
आदिवासी साहित्यातील आत्मकथनांचा अभ्यास करणाऱ्या नव अभ्यासकांना हे संशोधन मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल असे झाले आहे. विशाल साळवे यांना पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने या अभ्यासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती दिलेली होती.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष शामशेठ होनराव, सचिव अक्षय काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.मुकुंदराव काळे, कार्याध्यक्ष राजेश काळे, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काळे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे, डॉ. पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपटराव माने इ.नी अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा :
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार
धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज