जुन्नर / शिवाजी लोखंडे : आंबे गावातील काठेवाडी येथे लक्ष्मण जावजी काठे यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लागलेल्या आगीने कुटुंबावर संकट ओढवले आहे.
जुन्नर : घरफोडी व चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश
हिरडा भाव आणि महामंडळाकडून खरेदीबाबत आज घोडेगाव प्रकल्प कार्यालयात बैठक
सविस्तर वृत्त असे की काठे यांच्या घराच्या माळ्यावर पावसाल्याचे पूर्व नियोजन म्हणुन माळ्यावर जनावरांसाठी पेंढा भरून ठेवला होता. काल रात्री १ सुमारास घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घरातलं पेंढ्याला आग लागली. मात्र प्रसंगवधान राखत शेजारील ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. तर जनावरांचा चारा आणि घरातील साहित्य मात्र पूर्णपणे जाळून खाक झाले, असल्याची माहिती सरपंच मुकुंद घोडे व पोलीस पाटील वैशाली शेळकंदे यांनी दिली.
या घटनेचा पंचनामा कामगार तलाठी, ग्रामसेवक व सरपंच, पोलिस पाटील यांनी केला असून 10 सिमेंट पत्रे, वैरण, तांदूळ, हिरडा आणि साहित्य असा 40,000 रूपयांचे नुकसान झालेले आहे.
जुन्नरला हिरड्याची आवक सुरू; आदिवासी बांधवांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन बाळ हिरडा
लक्ष्मण जावजी काठे म्हणाले, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरात सर्व तजवीज करून ठेवलेले साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर शासनाकडून मिळावी.