जुन्नर /आनंद कांबळे : जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार वसंत शिंदे यांची तर सचिवपदी सचिन कांकरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सन २०२३-२४ या वर्षाकरिता करण्यात आली आहे, अशी माहिती मावळते अध्यक्ष दामोदर जगदाळे यांनी दिली.
नारायणगाव येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हि निवड करण्यात आली. वार्षिक सभेतील सर्व विषयांना मंजुरी देत हि सभा खेळीमेळीत पार पडली. पत्रकार संघाच्या घटनेनुसार अध्यक्ष आणि सचिव पदाची निवडणूक घेण्यात आली, या मध्ये संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार वसंत शिंदे यांची तर सचिवपदी सचिन कांकरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सन २०२३ – २४ वर्षा करिता जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : वसंत शिंदे (अध्यक्ष), सचिन कांकरिया (सचिव), ऍड . संजय शेटे ( कार्यध्यक्ष ), विजय देशपांडे, प्रवीण ताजने (उपाध्यक्ष), अशोक खरात (सहसचिव) विजय चाळक (खजिनदार), अण्णा भुजबळ (पुणे जिल्हा निमंत्रक), अर्जुन शिंदे (प्रसिद्धीप्रमुख).
विभाग प्रमुख : गोकुळ कुरकुटे (आळेफाटा विभाग प्रमुख), नितीन गाजरे (जुन्नर विभाग प्रमुख), रा.ना. मेहेर (ओतुर विभाग प्रमुख), रवींद्र कोल्हे (नारायणगाव विभाग प्रमुख).
• कार्यकारणी सदस्य : अतुल कांकरिया, मंगेश पाटे, नितीन ससाने, राजू कणसे, अमर भागवत , दिनकर आहेर , अशोक डेरे , मीननाथ पानसरे , हितेंद्र गांधी , विजय लोखंडे ,
• सहयोगी सदस्य : अमोल गायकवाड, महेश घोलप, चंद्रकांत औटी, प्रविण फल्ले, फकीर आत्तार, ज्ञानेश्वर केंद्रे.
• तक्रार निवारण समिती : दादा रोकडे (अध्यक्ष), ज्ञानेश्वर भागवत (उपाध्यक्ष), अण्णा लोणकर (सचिव).
• सल्लागार : भरत अवचट, आनंद कांबळे, धर्मेंद्र कोरे, रवींद्र पाटे, लक्ष्मण शेरकर, दामोदर जगदाळे.
• कायदेशीर सल्लागार : ॲड. यु.सी. तांबे, ॲड. भूषण संजय शेटे, ॲड.रवींद्र देवकर.