वडवणी (बीड) : वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे शिवजन्मोत्सवा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच फळे वाटपानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावातील जेष्ठ मंडळींनी तरुणांना मार्गदर्शन केले व शिवजयंती ही नाचून करण्यापेक्षा वाचून करावी हे विचार आत्मसात केल्याबद्दल तरुणांचे अभिनंदन केले. यानंतर रक्तदान शिबिर शिबिराला सुरुवात झाली, रक्तदान शिबिर हे ग्रामीण भागात घेणे ही कठीण बाब होती. परंतु ज्या वेळेस रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. सर्व धर्मीय आणि विशेष म्हणजे मुस्लिम धर्मियांनी सुद्धा या रक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग घेतला व सामजिक एकात्मतेचा संदेश दिसून आला.
रक्तदान करण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या रक्तपेढीच्या पिशव्या कमी पडाव्यात असा विक्रम चिंचवणवासीयांनी घडवून आणला विशेषता जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर प्रथमच घेण्यात आले. रक्तदानाबद्दल तरुणांनी जनजागृती केली होती यामुळे ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेतला यावेळी चिंचवण व चिंचवण पंचक्रोशीतील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
विशेष म्हणजे तरुणांनी रक्तदात्यांना सुंदर अशा प्रकारची शिवप्रतिमा भेट दिली. यावेळी लढा दुष्काळाशी टीमचे समन्वयक राज पाटील व जेष्ठ पत्रकार अशोक निपटे यांनी भेट देऊन शंभर वृक्ष रक्तदात्यांना भेट दिली व तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात तरुणांनी रक्तदानाचा उच्चांक गाठत 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले। शेवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व रक्तदात्यांची आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व ज्यावेळी कोणत्याही रुग्णास रक्ताची गरज भासल्यास चिंचवणची तरुण रक्त देण्यास मागेपुढे पाहणार मागेपुढे पाहणार नाहीत, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.