Friday, December 27, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी डॉ.पुरुषोत्तम काळे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी डॉ.पुरुषोत्तम काळे यांची बिनविरोध निवड

घोडेगाव(ता.आंबेगाव) : येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.पुरुषोत्तम काळे यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या नियतकालिकाच्या मुख्य संपादकपदी सलग दुसऱ्यांदा ५ वर्षाच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. डॉ. पुरुषोत्तम काळे हे गेली १५ वर्षे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या कार्यकारी मंडळावर सदस्य आहेत. त्यांनी साहित्य परिषदेच्या विविध समित्यांवर उत्कृष्ट काम केले आहे. त्यांची मुख्य संपादकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यांच्या या निवडीबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, मानद सचिव अॕड.मुंकुंद काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर, प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सल्लागार आणि सर्व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या निवडीमुळे डॉ.काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय