Sunday, December 8, 2024
Homeराज्य"जलयुक्त"नव्हे, तर "झोलयुक्त"योजना - सचिन सावंत

“जलयुक्त”नव्हे, तर “झोलयुक्त”योजना – सचिन सावंत

मुबई : “जलयुक्त”नव्हे, तर “झोलयुक्त”योजना अशी टिका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असलेली “जलयुक्त शिवार योजना ही पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आली आहे. 

“जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ठ पावसाचे पाणी गावच्या शिवारात अडविणे,भूगर्भातील पाण्याच्या पातळीत व सिंचन क्षेत्रात वाढ करणे त्याचप्रमाणे पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे असे होते.या सर्व उद्दिष्टांवर ही योजना सपशेल फेल ठरली असून,”जलयुक्त” शिवार योजना ही “झोलयुक्त” शिवार योजनाच होती.अशा परखड शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर तीर तिर मारला.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की,जलयुक्त योजनेवर अंदाजे दहा हजार कोटी खर्च झाला आहे.इतका मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही सन २०१९ च्या मे महिन्यात राज्यात ७ हजाराहून अधिक टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. त्याचप्रमाणे राज्यात सन २०१८ च्या “भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या”अहवालानुसार २५२ तालुक्यात १३,९८४ गावांत एक मीटरपेक्षा अधिक भूजल पातळी खाली गेली व प्रत्यक्ष राज्यात त्याच अहवालानुसार एकूण ३१,०१५ गावांना पाण्याची पातळी खोल गेली होती. असे असतांनाही फडणवीस सरकार जवळच्या ठेकेदारांना जगविण्यासाठी या योजनेचे गुणगान करीतच राहिले.

“मी लाभार्थी”अशा खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटी रुपयांची अक्षरशः उधळण करण्यात आली आहे. सखोल चौकशी केली असता प्रत्यक्ष भाजपाचेच कार्यकर्ते लाभार्थी दाखवण्यात आले. असा स्पष्ट आरोपही सावंत यांनी केले आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी एसीबीकडून करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्यसरकाने दिले आहेत. यापूर्वी कॅग’ने देखील या योजनेच्या भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका ठेवलेला असल्याचे समजते.


संबंधित लेख

लोकप्रिय