युक्रेन : रशिया-युक्रेनमधील युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला केला असून तेथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर आता रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिला आहे.
रशियाने बेलारुसमध्ये चर्चेचा प्रस्ताव युक्रेनला पाठवल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपण तयार असल्याचं म्हटलं. मात्र, बेलारुसमध्ये चर्चा करणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. चर्चा करायचीच असेल तर बेलारूस ऐवजी इंग्लंड, हंगेरी, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट, इन्स्ताबुल किंवा बाकु यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चा करू असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. कारण बेलारूसचा हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
युक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल भावूक
#BREAKING Zelensky says ready for talks with Russia, but not in Belarus pic.twitter.com/uew5fSvJJ7
— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
दरम्याम, रशिया आता युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ला करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रियांका चोप्राने युक्रेनमधील परिस्थितीवर पोस्ट केली शेअर, म्हणाली…
युक्रेन – रशिया यांच्या युध्दा दरम्यान आता उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र समुद्रात डागले