Sunday, March 16, 2025

नाशिक मध्ये रिक्षावर झाड कोसळून दोघे मृत्युमुखी!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

नाशिक :  नाशिकमध्ये रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. नाशिकच्या आयटीआय सिग्नजवळ हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक व एक प्रवाशी महिलेचा करुण अंत झाला.या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. दरम्यान अद्याप या दोघांचेही नाव समजू शकलेले नाही.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

नाशिक सातपूरकडे जात असलेला रिक्षा आयटीआय सिग्नलजवळून जात असताना अचानक रिक्षावर भलं मोठा वृक्ष कोसळला. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचालकासह एका प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. तसेच पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. मात्र झाड रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालक आणि महिला दोघेही अडकून होते. या दोघांना काढण्यासाठी स्थानिक नागरिक सह पोलिसांनी मदतकार्य केले. बरीच उशिराने या दोघांना काढण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दुर्दैवी घटना झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. अद्याप या मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. शिवाय नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. सध्या या दोघाही मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्यसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Related Articles

- Advertisement -

Latest Articles