Saturday, April 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे काळाच्या पडद्याआड ,येथे होणार अंत्यसंस्कार !

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे काळाच्या पडद्याआड ,येथे होणार अंत्यसंस्कार !

 

पुणे : रंग-रेषांच्या चतुरस्र कलाकर्तृत्वाने अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (८७) त्यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले. अंत्यदर्शन त्यांच्या मॉडेल काॅलनीतील निवासस्थानी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेता येईल.

१९३५ मध्ये बेळगावात जन्मलेले परांजपे जगभरात बोध चित्रकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. जहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत गेली अनेक वर्षे चित्रकार रवी परांजपे, आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहे.

परांजपे यांनी १९६६ ते ६९ या काळात नैरोबी (केनिया) येथील जाहिरात क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी, दक्षिण कोरियातून प्रसिद्ध होणाऱ्या इटरनॅशन डिझाईन जर्नल या मासिकाने त्यांचा केलेला सनामास अमेरिकन आर्टिस्ट्स अकॅडमीतर्फे जाहीर झालेला जागतिक पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका स्पष्ट करतो. परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय