Home राष्ट्रीय Train accident : तामिळनाडूत रेल्वे अपघात, डबे पेटले

Train accident : तामिळनाडूत रेल्वे अपघात, डबे पेटले

Train accident

तामिळनाडू – देशात रेल्वे अपघातची मालिका सुरूच आहे. सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी रात्री म्हैसूरहून दरभंगा येथे जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूतील कावरपेट्टई स्टेशनजवळ मालगाडी जोरदार धडकली आहे. (Train accident)

मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस ट्रेन मेन लाईनवर जाण्याऐवजी लूप लाईनवर गेली. आणि मालगाडी बरोबर टक्कर झाली, असा प्राथमिक तपास आहे. यातील गाडीचे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. या अपघातात गाडीच्या डब्यांना आग लागली. टक्करीत सहा डबे रुळावरून घसरले आणि या अपघातात एकूण 19 प्रवासी जखमी झाले, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. (Train accident)

अपघातानंतर रेल्वे विभागातर्फे दरभंगा रेल्वे स्थानकावर रेल्वेतील प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केंद्र सुरू केले आले.दरम्यान हा अपघात नेमका का, कसा झाला त्यामागचे कारण शोधण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे.



Exit mobile version