Home राज्य ‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

Police Bharti : 17 हजार पोलिसांच्या मेगाभरतीचं ठरलं Police Bharti recruitment of 17 thousand policemen was decided

मुंबई : दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

हे ही वाचा :

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

Exit mobile version