Friday, December 27, 2024
Homeराज्यसीटूसह कामगार संघटनांचा विधेयक ३३ ला विरोध, दोन दिवस राज्यभरात निदर्शने

सीटूसह कामगार संघटनांचा विधेयक ३३ ला विरोध, दोन दिवस राज्यभरात निदर्शने

नाशिक : हिवाळी अधिवेशनात सोमवारी ( दि. २६ ) विधेयक क्रमांक ३३ विधानसभेत मांडण्यात येणार आहे. हे विधेयक कामगारविरोधी व मालकधार्जिणे असल्याचा आरोप सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला असून या विधेयकाला विरोध करण्यासाठी रविवार व सोमवार असे दोन दिवस राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार, महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक, महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम या सर्व अधिनियम सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक ३३ मांडण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्राने श्रमिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या कामगार कायद्यामुळे औद्योगिक संबंध सर्वसाधारणपणे चांगले राहिलेले आहेत. यामुळे उद्योजक महाराष्ट्राला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या सांगण्यावरून यात दुरुस्तीची आवश्यकता नाही. महाराष्ट्राने या प्रश्नाकडे स्वतंत्रपणे बघितले पाहिजे. महाराष्ट्रातील कामगारांची परिस्थिती, कायद्यांची अंमलबजावणी, कामगारांच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा महाराष्ट्र शासनाने अभ्यास करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय