Sunday, February 16, 2025

थोरात दांपत्याचा विशेष पुरस्काराने सन्मान

पिंपरी चिंचवड : पूर्णनागर, चिंचवड येथील किशोर थोरात व सविता थोरात यांना दिव्यक्रांती सोशल फौंडेशन, रत्नागिरी या संस्थेचा राष्टीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” आणि पत्नी सविता थोरात यांना “आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर गौरव सोहळा हा ऑटो क्लस्टर एक्सिबिशन सेंटर, चिंचवड येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे मेट्रो चे brand ambassador व पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर हे होते. 

महागाई आणि बेरोजगारी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सदर पुरस्कार सुर्यदत्त इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ संजयजी चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी आधार महिला मंडळाच्या संस्थापिका सुप्रियाताई चांदगुडे आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई गवळी यांना देखील सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद डुकरे, रविराज आळणे, उमेश सपकाळ, सदाशिव थोरात यांनाही सन्मानित करण्यात आले.

आधार शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उल्लेखनीय कामगिरीबद्दल सदर पुरस्कार देण्यात आले आहेत.  शश्रेय आधार टीमला जाते, या पुढेही आधार च्या माध्यमातून समाजाची सेवा करून आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार नक्कीच लागेल अशी थोरात यांना अपेक्षा आहे. दिव्यक्रांती सोसिएल फौंडेशन ने थोरात यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने थोरात यांनी संस्थेचे आभार मानले.

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

थोरात यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी सविता थोरात यांचेही शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय उत्कृष्ट असून त्यांच्या कामाची दखल घेत दिव्यक्रांती संस्थेने त्यांनाही “आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या दांपत्याचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम अतिशय  उल्लेखनीय असून त्यांचे यापुढील कामही असेच चालू राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली.

दोघांनाही एकाच कार्यक्रमात मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. समाजातील सर्व या दोघांचेही कौतुक केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन हे डॉ. विक्रम शिंगाडे आणि ऍड. प्रीती मॅडम यांनी केले होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles