Friday, December 27, 2024
Homeराजकारण"इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी फाटू नये याची काळजी घ्या"...

“इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी फाटू नये याची काळजी घ्या” चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्ये सुरू असलेल्या वादात आता आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. “इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत” अशी खोचक टीका मिटकरी यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, “ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल” त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं”, असा प्रश्न अजितदादांनी विचारला होता, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत अजितदादा, जरा सांभाळून बोला. आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, आम्ही बोलू लागलो तर महागात पडेल असे म्हटले होते, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेत खोचक टीका केली आहे. 

 

 अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, फाटलेलं शिवलं पाहिजे असं म्हणतात. तुम्ही फाटलेल्या तोंडाचे आहात हे स्वतः कबूल केलंय   इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या. असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय