मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (kareena kapoor) हिचा जबाब नोंदवला असून तिच्या खुलाशामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
दागिन्यांना हातही लावला नाही – Kareena kapoor
१६ जानेवारी रोजी सैफच्या घरी एका अज्ञात हल्लेखोराने फायर एस्केपमधून घरात प्रवेश करून जीवघेणा हल्ला केला. सुरुवातीला हा प्रकार चोरीसाठी असल्याचे मानले जात होते. मात्र, करीनाने दिलेल्या जबाबानुसार, “आरोपी खूप आक्रमक होता. त्याने सैफसोबत झटापट केली, पण त्याने घरातील समोर असलेल्या मौल्यवान दागिन्यांना हातही लावला नाही.”
करीनाने पोलिसांना सांगितले की, “हल्ल्यावेळी आरोपीचा स्वभाव अतिशय हिंसक होता. सैफ आणि कुटुंबीयांनी कसेबसे त्याच्यापासून बचाव केला आणि घराच्या १२ व्या मजल्यावर पळून जाण्यात यशस्वी झाले.”
घटनास्थळी तपासासाठी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमला आरोपींच्या बोटांचे ठसे सापडले आहेत. याशिवाय पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटवली असून त्याला अटक करण्यासाठी १० विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.
या घटनेनंतर करीना कपूर अत्यंत चिंतेत असल्याचे समोर आले आहे. तिची बहीण करिश्मा कपूर तिला तिच्या घरी घेऊन गेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, करीनाच्या जबाबातून आरोपीचा हेतू समजून घेण्यास मदत झाली असून हा हल्ला चोरीसाठी नव्हता, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन-९ दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फायर एस्केपमधून घरात प्रवेश केला होता. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून बोटांचे ठसे जमा केले असून एका आरोपीची ओळख पटली आहे. त्याला पकडण्यासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा :
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा
भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी
पुणे : नारायणगाव येथे तीन वाहनांचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, मृतांपैकी पाच जण एकाच गावातील
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर
चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरने 15 वाहनांना उडवले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर