Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगुलाबाची लागवड करून शेतकऱ्याने बदलले नशीब, वर्षभरात 'इतक्या' लाखांची कमाई

गुलाबाची लागवड करून शेतकऱ्याने बदलले नशीब, वर्षभरात ‘इतक्या’ लाखांची कमाई

लातूर : सध्या फळे ,भाजीपाला, धान्य पिकवण्याकडे शेतकरी वर्गाचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आधुनिक शेतीची कास धरण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. परंपरागत चालत आलेल्या शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळत नसले तरीही नव्या वाटा निवडताना तो गोंधळतो. मात्र काही शेतकरी प्रगतीच्या वाटा धरत स्वतःची आर्थिक उन्नती करत असतात. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी गुलाब शामराव सुरवसे यांनी गुलाबाची लागवड (ROSE CULTIVATION) करुन लाखो रुपये कमावले आहेत.

वर्षाची कमाई लाखो रुपये

कमी जमीन, कमी मेहनत, कमी वेळ असं सगळं लागतं असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनंतपाल तालुक्यातील शेतकरी बाबूराव शामराव सुरवसे यांनी ९ एकरात गुलाबाची शेती केली आहे. गुलाबाच्या शेतीमधून त्यांना वर्षाला साडेतीन लाख रुपयाचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भागातील अनेक शेतकरी गुलाबाची शेती शिकण्यासाठी बाबूराव शामराव सुरवसे यांच्याकडे येत आहेत.


सगळ्या शेतीसाठी फक्त ३५ हजार खर्च


बाबूराव शामराव सुरवसे यांनी त्यांच्या मालकीच्या ९ एकर शेतात गुलाब लावला आहे. शेतीला एकूण सगळा खर्च ३५ हजार रुपये आला आहे. सध्या गुलाबाच्या झाडांना फुलं लागायला सुरु झालं आहे. त्यांना दिवसाचा सगळा खर्च काढला, तर १ हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात.

प्रत्येक महिन्याचा फायदा ठरलेला असतो

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आता व्यवसाय म्हणून गुलाबाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यातं आलं आहे. तिथले शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. त्याचबरोबर तिथल्या तहसिलदारांनी सुध्दा त्यांचं कौतुक केलं आहे. प्रत्येक महिन्याचा शेतकऱ्यांचा फायदा ठरलेला असतो.

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

.

संबंधित लेख

लोकप्रिय