पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना धो महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
आयोजित करण्यात आलेल्या “नभं उतरू आलं ” या सांगितीक कार्यक्रमाच्या माध्यमातून कविवर्य ना. धो महानोरांना स्वरांजली वाहिली. (PCMC)
यावेळी कविवर्य यांच्या सुकन्या सरला महानोर- शिंदे, हभप शेखर महाराज जांभूळकर, डॉ अमरसिंह माने, कल्चरलचे अध्यक्ष विजय भिसे,कुंदा भिसे धारूतात्या बालवडकर, शिल्पा बिडकर, डॉ स्मिता बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)
यावेळी सतीश इंगळे,मनीषा निश्चल,धनंजय पवार,भारती न्यायाधीश यांनी गायन केले.
यावेळी कविवर्य महानोर यांनी रचलेल्या “चिंब पावसान रान आबादणी.. , जांभूळ पिकल्या झाडाखालीढोल.., भरलं आभाळ पावसाळी .., राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं..,लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला.., राजसा जावळी जरा बसा…,दूरच्या रानात केळीच्या बनात..,घन ओथांबून येती.. आम्ही ठाकर ठाकर.. मी रात टाकली.., अशी अवीट गोडीची अजरामर गाणी सादर करून रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.
या कार्यक्रमासाठी मिहीर भडकमकर यांनी संगीत संयोजन केले होते तर वाद्यांची साथसंगत अमन सय्यद (कि बोर्ड), विक्रम द्रविड(पॅड), अभिजित भदे ( तबला) पद्माकर गुजर(ढोलकी),पिनाक न्यायाधीश( गिटार) यांची लाभली.
प्रास्ताविक अध्यक्ष विजय भिसे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती