भोसरीच्या ओम रुग्णालयात यशस्वी प्रयत्न (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरी येथील ओम रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या आतड्यांची गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले .
वेदांत अनिल वाजगे ( वय 17, नारायणगाव) असे या मुलाचे नाव आहे. (PCMC)
वेदांतला गेली 4 वर्षांपासून जेवण पचत नव्हते. जेवल्यानंतर 10 मिनिटात खाल्लेले सर्व अन्नपदार्थ शरीराबाहेर उलटीद्वारे बाहेर टाकले जात होते. यामुळे वेदांतचे वजन कमी होऊन शरीराने दुबळा बनला होता.
दि 5 सप्टेंबर रोजी ओम रुग्णालयात भरती केले. तेव्हा त्याचे वजन फक्त 20 होते. ओम रुग्णालयाचे संचालक डॉ अशोक अगरवाल यांनी तपासणी करून आजाराचे निदान केले. त्याची अन्ननलिका अरुंद झाली होती. त्याला मेंजेट्रिक अरट्री सिंड्रोम हा आजार असल्याचे आढळून आले. उपचार करून वेदांतचे वजन वाढवले.
डॉ अशोक आगरवाल, डॉ निखिल जिल्लावार, डॉ दिलीप मेहता आणि त्यांच्या टीमने दि. 10 रोजी त्याच्यावर लॅप्रोस्कोपिक डिओडेनोजेजुनो स्ट्रॉमी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
आता वेदांतची प्रकृती स्थिर असून तो पूर्वी सारखे अन्न ग्रहण करू शकतो.
यावेळी निर्मला वाजगे (वेदांतची आई) म्हणाल्या कि, वेदांतला पुण्यातील प्रख्यात अशा सर्व रुग्णालयात दाखवले मात्र कुणीच उपचार करण्यासाठी भरती करून घेतले नाही. उपचार करू पण वाचेल कि नाही याची शाश्वती नाही. असे डॉक्टरांनी सांगितले.शिवाय उपचार खर्च अफाट सांगितला जायचा.
संगमनेरच्या एका रुग्णालयाने तर आमच्याकडून उपचार होणार नाही म्हणून ऍडमिट करून घेतलेचं नाही.
अशा परिस्थितीत आमच्या नातेवाईक दीपाली अरगडे यांनी ओम हॉस्पिटलचे डॉ. आगरवाल यांची शिफारस केली.आज डॉ आगरवाल यांनी कमी खर्चात यशस्वी शस्त्रक्रिया करून वेदांतचा जीव वाचवला.अशा शब्दात समाधान व्यक्त केले.
डॉ. आगरवाल म्हणाले कि, वेदांत हा 12 वी विज्ञान शाखेत शिकणारा हुशार विद्यार्थी आहे. त्याला देवाने आमच्या कडून उपचाराने बरा करून घेतले हे आमच्या साठी सदाभाग्याचे आहे.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती