Tuesday, June 18, 2024
Homeजिल्हाSchool Dress : शाळकरी मुलांसाठी 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू होणार

School Dress : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

मुंबई : राज्यातील शाळकरी मुलांसाठी महत्वाची बातमी आहे. 15 जूनपासून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांना सोमवार, बुधवार व शुक्रवारी नियमित गणवेश परिधान करणे आवश्यक असणार आहे. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागणार आहे. हा गणवेश कसा असेल ते जाणून घेऊयात… (School Dress)

राज्यातील शाळा 15 जून 2024 पासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे.स्थानिक महिला बचत गटामार्फत हे गणवेश तयार करण्याचे काम सुरू आहे. स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी 100 रुपये प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी 110 रुपये लागतात. ही रक्कम प्राथमिक शिक्षण परिषद खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी कसा गणवेश घालावा लागेल ते जाणून घेऊयात…

1 ली ते 4 थी मुली (School Dress)

नियमित आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक हा गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल. (School Dress)

5 वीच्या मुलींसाठी असा असेल गणवेश

आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर स्काऊट व गाईडचा गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक हा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल.

6 वी ते 8 वी मुली आणि 1 ली ते 8 वी मुली (ऊर्दू माध्यम)

आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल.

1 ली ते 7 वी मुले

आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावी लागेल तर स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल.

8 वी मुले

आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल, तर स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय