Friday, December 27, 2024
Homeकृषीशेतकरी आंदोलनाचा धसका; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे पेज केलं होतं बॅन. वाचा सविस्तर

शेतकरी आंदोलनाचा धसका; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे पेज केलं होतं बॅन. वाचा सविस्तर

दिल्ली  : देशभरात शेतकरी आंदोलन चांगलेच तापले आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची व्यापकता वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना संयुक्त किसान मोर्चाने किसान एकता मंच या नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले मात्र या पेजवरून रविवारी रात्री बराच गोंधळ झाला.

रविवारी फेसबुकनं हे पेज ब्लॉक केल्यानंतर फेसबुक विरोधात संताप वाढला होता त्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.

या शेतकरी आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. हे पेज रविवारी अचानक फेसबुककडून बंद करण्यात आलं होतं.

फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे असे योगेंद्र यादव यांनी म्हंटले आहे.

 

फेसबुक सोबतच इन्स्टाग्रामचे देखील किसान एकता मंचचं अकाऊंटही बंद केल्याचं योगेंद्र यादव यांनी म्हंटलं आहे. फेसबुकनं केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, त्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं.

फेसबुकचे कारवाईनंतर स्पष्टीकरण

किसान एकता मंचचं फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आलं. फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावर नंतर फेसबुकनं खुलासा केला आहे. किसान एकता मंचच्या पेजकडून कंपनीच्या कम्युनिटी नियमांचं पालन केलं जात नव्हतं. म्हणून पेज बंद करण्यात आलं होतं, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.

 

संबंधित लेख

लोकप्रिय