Friday, December 27, 2024
Homeजिल्हा"आपले अण्णाभाऊ साठे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार सोलापुरात

“आपले अण्णाभाऊ साठे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार सोलापुरात

बार्शी : लोकवाड्मय प्रकाशन गृहाकडून प्रा.तानाजी ठोंबरे लिखीत “आपले अण्णा भाऊ साठे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती ३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

या निमित्ताने अण्णाभाऊ साठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादाचे वक्ते डॉ. भालचंद्र कांगो, प्रा.डॉ. नभा काकडे हे असणार आहे, तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार नरसय्या आडम, प्रा.डॉ. महेंद्र कदम, गणेश माने, कॉ. रवींद्र मोकाशी, सुरेश पाटोळे, राजू क्षीरसागर, विजय पोटफोडे, युवराज पवार, असिफ नदाफ, विष्णू गायकवाड, डॉ. दत्ता घोलप, अॅड. गोविंद पाटील आदी उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम समविचारी सभा सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, अण्णाभाऊ प्रेमींनी, पुरोगामी व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कॉ. प्रविण मस्तुद यांनी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय