मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ मे पर्यंत लॉकडाऊन केलेला होता. मात्र आता मंत्रीमंडळाच्या बैठकी मध्ये राज्यात लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात १ मे नंतर पुढील १५ दिवस हे लॉकडाऊन कायम राहणार आहे. १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आता आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक वाचा :
राज्यात लॉकडाऊन वाढवला, निर्बंध कडक होणार, असे असतील नवे नियम