शहादा (नंदुरबार) : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) शहादा तालुका कमिटीचे वतीने शेतकऱ्यांवरील दडपशाही थांंबवून शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी विरोधी कायदे तसेच नवीन कामगार कायदे रद्द करा, शेतकरी नेत्यांंवर खोट्या केसेस मागे घेण्यात याव्यात, किसान नेत्यांना स्थानबंद्धता केली आहे, त्यांना बिनशर्त सोडून द्यावे, शेतकर्यांच्या मालाला किफायतशीर दीडपट भाव द्यावे, या मागण्या करण्यात आंदोलनात करण्यात आल्या.
निवेदन देतेवेळी सुनिल गायकवाड, अरविंद कुवर, रवि मोरे, नईम सय्यद, राजाराम, ठाकरे, संतोष गायकवाड, दिनेश गुलाले, दिपक मोहिते, प्रदीप पिंपंळे, प्रशांत पवार, साजीकखान नशीरखान उपस्थित होते.