Wednesday, December 4, 2024
Homeग्रामीणआदिवासींना अपशब्द वापरणाऱ्या अभिनेत्री भारती सिंगवर कारवाई करा - राजेंद्र पाडवी

आदिवासींना अपशब्द वापरणाऱ्या अभिनेत्री भारती सिंगवर कारवाई करा – राजेंद्र पाडवी

सांगली : आदिवासींंना अपशब्द वापरणाऱ्या अभिनेत्री भारती सिंगवर कारवाई करावी, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.

भारती सिंग (मुळ पत्ता -अमृतसर, पंजाब ) यांनी खतरा खतरा खतरा या कलर्स टिव्ही वरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून “ये आदिवासी लोगही ऐसा कच्छा पहनते होंगे! ऐसावाला!” अश्लील कृती करत जातीवाचक अपशब्द वापरून हसत कृती केली आहे. भारती सिंग हिच्यावर कडक कारवाई करावी, आदिवासी समाजातर्फे याचा जाहीर निषेध करत असल्याचे ही म्हटले आहे.

यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान होऊन आदिवासी समाजातील लोक दुखावले आहेत. भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये  प्रचंड संताप निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक व आईवाचक अश्लील शिविगाळ करणे, जातीवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाच अपमान करणे, जातीवाचक बोलून आदिवासी समाजामध्ये तेड निर्माण करणे इत्यादी गैरप्रकार काही समाजकंटकांद्वारे जाणीवपूर्वक सुरूच आहे, अशा समाजकंटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी थांबवला पाहिजे. नाहीतर अशा समाजकंटकांविरोधात आदिवासी समाजातर्फे आंदोलनाद्वारे तीव्र रोष व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ही म्हटले आहे.

भारती सिंग यांच्या कलर्स टिव्ही वरील खतरा खतरा खतरा हा शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय