हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररंग २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे शहरातील ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील ६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वररंग २०२२ स्पर्धेत सर्वात जास्त पारितोषिके मिळविणारे कॉलेज म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून कॉलेजचे नाव उंच करण्याचा प्रयत्न केला आहे.
संगीत स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोक वाद्यवृंद सोलो महावीर रणदिवे (FYBA), द्वितीय पारितोषिक वेस्टर्न गाणे शिवानी वाघ (FYBSc) यांना मिळाले. नृत्य स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोकसामुहिक नृत्यास मिळाले.
नाट्य स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक एकांकिकेस, द्वितीय पारितोषिक मुकाभिनयास, प्रथम पारितोषिक मिमिक्रीस, प्रथम पारितोषिक स्किट या प्रकारास मिळाले. ललित कला स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक रांगोळी, द्वितीय पारितोषिक कोलाज व द्वितीय पारितोषिक फोटोग्राफी या प्रकारास मिळाले.
या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. विद्यार्थ्यांच्या या यशात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, डॉ.नम्रता मेस्त्री-कदम, डॉ. विश्वास देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, सर्व स्पर्धांचे चेअरमन व स्पर्धा प्रमुख, ज्युनियर विभागप्रमुख या सर्वांचे योगदान आहे. त्याचबरोबर साधना संकुलातील कलाशिक्षक कारभारी देवकर आणि भानुदास पाटोळे यांचेही सहकार्य लाभले.