Thursday, December 26, 2024
Homeराजकारणसस्पेंन्स वाढला : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्टीटरअकाउंटवरुन राष्ट्रवादीचा 'प्रोफाईल फोटो'...

सस्पेंन्स वाढला : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्टीटरअकाउंटवरुन राष्ट्रवादीचा ‘प्रोफाईल फोटो’ हटवला!

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार किंवा राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेवून भाजपासोबत युती करणार अशी चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरू असतानाच अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील राष्ट्रवादीचा प्रोफाईल फोटो हटवला आहे.त्यामुळे या चर्चेबाबत संस्पेन्स आणखी वाढला आहे.

अजित पवार यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ४० आमदार पवार यांच्या सोबत असून, भाजपासोबत जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी चर्चा शिगेला पोहोचली आहे. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ”असे काहीही आमच्या मनात नाही. ही सर्व चर्चा केवळ मीडियामध्ये घडवून आणली जात आहे.” असा दावा करण्यात आला.

दरम्यान, अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्टिवटर या दोन्ही अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नावाचा उल्लेख असलेला प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. त्यामुळे बंडखोरी आणि राजकीय उलथापालथ बाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय