Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आज सकाळपासून राज्यातील राजकारणात मोठे नाट्य बघायला मिळाले. यासर्व प्रकरणावर स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

---Advertisement---

अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आमदारांच्या सह्या घेतल्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले कि, कुणीही 40 आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. मात्र अशा बातम्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

---Advertisement---

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चेला आणखीनच वाव मिळाला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles