Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

मुंबई  : ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, चिपको आंदोलनाचे प्रणेते, पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ९४ वर्षाचे होते. बहुगुणा यांचे कार्य जगभरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखे आहे. सुंदरलालजींच्या निधनाने पर्यावरण रक्षणाच्या जागतिक चळवळीचे प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सुंदरलाल बहुगुणा यांना ८ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. सुंदरलालजींनी समाजातील सामान्य माणसाला निसर्गाचे महत्त्व पटवून दिलं. उत्तराखंडच्या टिहरी येथे ९ जानेवारी १९२७ रोजी बहुगुणा यांचा जन्म झाला होता. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी लढण्यासाठी प्रेरित केले, ताकद दिली. निसर्ग वाचविण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने, पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य, नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील.

बहुगुणा यांनी आयुष्यभर हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केले त्यामुळे त्यांना ‘हिमालय रक्षक’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांना १९८० मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय