पाकिस्तानने पकडलेल्या मच्छिमाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रतिदिन 300 रुपये शासन देणार !
डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या मागणी यश मिळाले असून त्यांनी दि. 02 ऑक्टोबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या मच्छिमारांना मदत करावी म्हणून ईमेल द्वारे निवेदन दिले होते. त्यावर दि. 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाकडून पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, आज सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही, म्हणून ते गुजरातच्या मच्छीमार समाजासोबत खलाशी म्हणून काम करत असतात. पण अनवधानाने मासेमारी करताना पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचा ठपका ठेऊन त्या मच्छीमारांना ताब्यात घेऊन त्यांना डांबून ठेवण्यात येते. हे अतिशय निंदनीय आहे. दि. 02 ऑक्टोबर 2022 रोजी आस्वाली डहाणू (जि. पालघर) चे मच्छिमार पाकिस्तान च्या ताब्यात असल्याचे कळताच आम्ही त्या मच्छीमार कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला होता व त्यांची तात्काळ सुटका व्हावी तसेच त्यांची सुटका होईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा विरोधी पक्ष नेते, मत्स्य व्यवसाय मंत्री, बंदरे मंत्री यांना निवेदन दिले होते. याप्रसंगी कॉ. विजय वाघात, कॉ. सुरेश सांबर, बाबू भेसकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत पकडलेल्या महाराष्ट्रातील मच्छिमाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रतिदिन तीनशे रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पाकिस्तानकडून अटक झालेल्या या मच्छिमार खलाशांना अटक झालेल्या दिवसापासून तीनशे रुपये प्रतिदिवस ही आर्थिक मदत करण्यात येईल. हा लाभ मिळण्यासाठी पात्र कुटुंबाचा दाखला, संबंधित ग्रामपंचायत किंवा तलाठी, तहसिलदार यांच्या सही शिक्क्याने सादर करणे आवश्यक आहे. मच्छिमारांच्या अटकेमुळे त्यांचे कुटुंब निराधार होते. अशा स्वरुपाची सहायता करण्याची योजना गुजरात मध्ये सुरु असल्याने, महाराष्ट्रात देखील मत्स्यव्यवसाय विभागाचा हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले सांगितले.
हे ही वाचा :
ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
संभाजी भिडे यांचे स्वातंत्र्य दिनाबाबत वादग्रस्त विधान
मोठी बातमी : उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी
ZP : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
NHM गडचिरोली अंतर्गत 80 पदांसाठी भरती; 30 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख