Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याकष्टकरी संघर्ष महासंघाच्या महामोर्चाला यश,असंघटीत कामगारांची नोंदणी होणार

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महामोर्चाला यश,असंघटीत कामगारांची नोंदणी होणार

कष्टकरी संघर्ष महासंघाचे आझाद मैदान येथे आंदोलन
मुंबई: क्रांतीकुमार कडुलकर : (दि. १) : असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कामगार, रिक्षाचालक, घरेलू कामगार, सफाई कामगार, फेरीवाला, कंत्राटी कामगार  यांच्या विविध प्रश्नांना घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे कामगार नेते तथा कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा यशस्वी झाला असून राज्यातील असंघटीत कामगारांची लवकरच नोंदणी होणार आहे.

असंघटीत कामगारांना म्हातारपणी पेन्शन सुरू करा. असंघटीत कामगारांचे महामंडळ त्वरीत स्थापन करा. असंघटीत कामगारांना इ.एस.आय.सी. विमा लागू करा. कामगारांसाठी स्वस्तातील घरांची निर्मिती करा. असंघटीत कामगारांना किमान व समान वेतन, आजारपणाची रजा व बोनस हे हक्क लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. असंघटीतांच्या या महामोर्चासाठी राज्यभरातून हजारो लोक सहभागी झाले होते.


असंघटीत कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात कामगार उपसचिव स्वप्निल कापडणीस यांच्याशी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, सोलापूरचे जिल्हा सचिव सचिन गुळक, माधुरी जलमुलवार सहभागी झाल्या होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न समजून घेत सकारात्मक चर्चा केली. शासन असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी महिन्याभरात ऑनलाईन पोर्टल सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सोबतच असंघटीत क्षेत्रात पूर्वी ३९ घटक होते मात्र आता ३३९ घटक असल्याचे अभ्यासात समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


दरम्यान, कामगारांच्या प्रश्नांना घेऊन राज्यभरातून आलेल्या आंदोलकांची कामगार नेते सुरेश खाडे यांनी भेट नाकारल्याने आंदोलकांनी कामगार मंत्र्यांचा जाहीर निषेध केला. 

यावेळी आंदोलना वेळी,राष्ट्रीय समन्वयाचे प्रसाद बागवे,एन एच एफ राष्ट्रीय समन्वयक मैकंजी डाबरे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र,संघटक अनिल बारवकर,सचिन गूळग, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रेम वाघमारे,लातूर जिल्हा अध्यक्ष गोपाळ वाडीले, ठाणे जिल्हा अध्यक्ष निशांत बोने,यवतमाळचे घनश्याम पैठणकर, धाराशिवचे दादा खताळ, अहमदनगरचे तुषार जाधव, राजू बिराजदार बालाजी लोखंडे, संतोष माळी, माधुरी जलमूलवार, सिंधुताई जाधव, किरण साडेकर, परमेश्वर बिराजदार, राजु पठाण, अंबादास जावळे, अनिता वाघ, नितिन सुरवसे, शकीला सय्यद, प्रदिप मुंडे, चंद्रकांत कुंभार, लक्ष्मी गायकवाड, संभाजी वाघमारे,सुनिता दिलपाक, अर्चना कांबळे, सिद्धनाथ देशमुख, ज्योती इनामके, प्रगती सिनलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय