Thursday, December 5, 2024
Homeराज्यसिटूच्या मागणीला यश; महानगरपालिका देणार आशांना ३ हजार रुपये मानधन

सिटूच्या मागणीला यश; महानगरपालिका देणार आशांना ३ हजार रुपये मानधन

नांदेड (प्रतिनिधी) : कोविड काळात काम करणाऱ्या आशांना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका ३ हजार रुपये मासिक मानधन देणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) च्या वतीने महापालिकेला घेराव घालण्यात आला होता. याची दखल घेत महापालिकेने निर्णय घेतला आहे.  आदेश पत्रकात म्हटले आहे की, कोविड काळात उपाययोजना करण्यासाठी सध्या सर्वेक्षणाचे काम महापालिके तर्फे चाालू आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील कोविड -१९ चे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा वर्कर यांना २ हजार मानधन देण्यात येत होतेे.

सध्या कोविड -१९ विषयी आशा वर्कर यांचे जिकरीचे काम व कामाची वेळ पहाता सदर मानधन अतिशय अपुरे आहे. महानगरपालिके मार्फत त्यांना मानधन देणे आवश्यक आहे. त्यानुसार आशा वर्करचे काम करणाऱ्या ८६ कर्मचाऱ्या कोविड – १९ चे सर्वेक्षणाचे कामे चालू असे पर्यंतच मर्यादित महानगरपालिके तर्फे दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

नांदेड महापालिका आयुक्त मा. लहाने सर, उपायुक्त भोसीकर सर व महापालिका उपमहापौर सतीश देशमुख सर आणि सर्व प्रशासनाचे आभार. सिटू सलंग्न आशा वर्कर्स ताईंच्या व्यथा जाणून घेऊन नांदेड शहरात काम करणाऱ्या ८६ आशांंना आज न्याय दिला. 

उज्वला पडलवार

जिल्हा अध्यक्षा सिटू,

 आशा वर्कर्स संघटना

आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचा विजय आहे. तसेच शासकीय कर्मचारी दर्जा आणि वेतन श्रेणीसाठी हा लढा चालूच राहणार असल्याचे सिटूने म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय