Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणबांधकाम कामगारांना १० हजार रुपये निर्वाह भत्ता द्या; सिटू संघटनेची मागणी.

बांधकाम कामगारांना १० हजार रुपये निर्वाह भत्ता द्या; सिटू संघटनेची मागणी.

जालना (प्रतिनिधी) : सिटू प्रणित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने काल देशभर आंदोलन करण्यात आले. बांधकाम मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची उपासमार होत आहे ते आर्थिक संकटात आहेत त्यांना सरकारने लॉक  डाऊन काळात दरमहा १० हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, या मागणीला घेऊन जालना जिल्हा आंदोलन करण्यात आले.

बांधकाम कामगार कल्याण कायद्यातील बदल रद्द करा. बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करा. मागण्यासाठी देशभर सिटू प्रणित CWFI च्या वतीने गावपातळीवर ग्रामपंचायत समोर शहरात  मोहल्यात  किंवा आपापल्या घरा समोर उभे राऊन निदर्शने करण्यात आली. जालना जिल्ह्यात ही याला मोठया संख्येने प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ८० गावामधून १००० कामगारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला असल्याचे सिटूने म्हटले आहे.

बांधकाम कामगारांच्या मागण्या :

१. केंद्र व राज्य सरकारने नोंदीत व नोंदणी न झालेल्या परंतु प्रत्यक्षात बांधकाम मजूर असलेल्या बांधकाम कामगार- कारागिरांना दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे. बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाकडे ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध आहे. या निधीचा वापर यासाठी करता येऊ शकतो.

२. बांधकाम मजुरांचे नोंदणी व नूतनीकरण रखडले आहे. गेल्या एक वर्षापासून कर्मचारी उपलब्ध नसल्याने नोंदणी होत नाही व नूतनीकरण होत नाही व त्यामुळे कामगारांना विविध योजनांचे लाभ मिळत  नाहीत.त्यामुळे बांधकाम मजुरांची नोंदणी सुलभ करण्यात यावी व नोंदणी , नूतनीकरण तातडीने करण्यात यावे. 

३. बांधकाम कामगारांना लॉकडाऊन मध्ये मजूर करण्यात आलेले २ हजार रुपये आर्थिक अर्थ सहाय्यात वाढ करून ५ हजार रुपये अर्थ सहाय्य तातडीने कामगारांच्या खात्यात जमा करा.

४. पूर्वीच्या आघाडी सरकारने बांधकाम कामगारांसाठी लागू केलेली  मेडिक्लेम व अपघात योजना बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी पूर्वी प्रमाणे सुरु करा.

५. बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या वारसांना मृत्यू पोटी मिळणारा–या अपघात विमा रक्कमेच्या अटी किचकट असल्याने प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरून लाभ देण्यात यावा.

६. बांधकाम नोंदीत कामगारांच्या अवजारे खरेदी व विविध लाभांचे प्रकरणे सन. २०१७-२०१९ चे कार्यालयात जमा असून त्याचा लाभ त्वरित देण्यात यावा.

७. ५ हजार रुपये अवजारे खरेदी योजना पूर्ववत चालू करा.

८. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या घर बांधणीसाठी  रुपये १० लाख अनुदान द्यावे. 

९. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तज्ञ समिती व सल्लागार मंडळ यांचेवर सिटूचे कामगार प्रतिनिधी घ्या. 

१०. याशिवाय बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी व कामगार कार्यालयामध्ये येणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी. या मंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्गाचे नियुक्ती करण्यात यावी.

आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात सिटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, सचिव गोविंद आर्दड, सुभाष मोहिते, अनिल मिसाळ, अजित पंडित, बंडू जाधव, बाळू आर्दड,सोनू भोरे, जनार्धन भोरे, गजानन पातर फळे, दीपक शेळके, प्रभाकर चोरमारे, दिगंबर वाघूनडे, अनसिराम गणगे आदी यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

                   

संबंधित लेख

लोकप्रिय