मांजरी बु. : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बु., पुणे येथील पीडीईए टीम जॅग्वारच्या विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेकनोशियन – वर्ल्ड रोबोटिक्स चॅम्पियनशिप २०२२ – रोबो सॉकर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयाचे पारितोषिक प्राप्त केलेले आहे.
इराण, मलेशिया, इराक, बांगलादेश, नेपाळ अशा विविध ४७ देशांमधून या स्पर्धेमध्ये ८०० टीम सहभागी झालेल्या होत्या. ऑल इंडिया कौन्सिल फॉर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन व मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली याठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. पीडीईए टीम जॅग्वारमध्ये परीक्षित थोरात, विनायक काळभोर, सुरज साबळे, रोहन पाटील, विशाल शिरफ़ुले, अनिकेत साळुंखे, आकाश लंके, महेश भनवसे यांनी सहभाग घेतला होता.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहन देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ.आर.व्ही.पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.