मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यापूर्वीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यावेळेपासूनच ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली होती. त्यानुसार आता राज्यात 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
?New strict restrictions under #BreakTheChain?
To be implemented from 22nd April 2021, 8pm onwards pic.twitter.com/ifyrcQCbnH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
गेल्या 2 दिवसांपासून कोरोनाच्या स्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत होती. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला दिला होता. परंतु , राज्यातील कोरोनाची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. 1 मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.
दरम्यान, कोविड -19 चा प्रसार थांबविण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. जे 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम राहतील. परंतु , महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. हे बदल 22 एप्रिल संध्याकाळी 8 वाजेपासून 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम राहतील.