नाशिक (दौलत चौधरी) : भारतीय कामगार न्याय सभा सुरक्षा रक्षक/माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस राजेश काजळे व किरण चंद्रमोरे यांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांला घेऊन सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील 14 सुरक्षा रक्षक यांना दिनांक 1 जानेवारी 2019 पासून ते आज पर्यंत मंडळाच्या किमान वेतनानुसार वेतन दिले जात नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक हे खूप दुःखी आहेत. तुटपुंज्या पगारावर महामारीच्या काळामध्ये वाढती महागाईचा सामना करावा लागत आहे.
नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील इतर सुरक्षा रक्षकांना 11 हजार 300 रुपये इतके वेतन मिळत आहे, अशी तफावत का ? हे विचारणा करण्यासाठी 14 सुरक्षा रक्षक हे मंडळातील सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष यांना मंडळाच्या नियमानुसार पुढील वेतन देऊ असे आयुक्तांनी आश्वासन दिले.
तरी आजपर्यंत ऍडव्हान्स वेतन दिले नाही तरी कधी मिळणार, असा संतप्त सवाल सुरक्षा रक्षक यांनी उपस्थित केला.